Nagpur Power Shift : नागपूर महापालिकेत सत्ता निश्चित ! सत्तापक्ष नेते ठरले, ‘बाल्या बोरकर’ गाजवणार सभागृह

Top Trending News    31-Jan-2026
Total Views |

nagpur
 
नागपूर : ( Nagpur Power Shift ) भाजपचे ज्येष्ठ अनुभवी नगरसेवक नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर हे मनपात सत्तापक्ष नेते असतील. त्यांच्या पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्तीची घोषणा शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी शनिवारी केली. गांधीसागर येथील रजवाडा पॅलेस येथे नगरसेवकांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nagpur Power Shift ) यांनी मोबाईलरून नगरसेवकांना मार्गदर्शन केले.
 
मनपात चौथ्यांदा निवडून आलेले बाल्या बोरकर हे सभागृहातील अनुभवी नगरसेवक ( Nagpur Power Shift ) आहे. २००७ मध्ये त्यांनी सर्वप्रथम माजी महापौर नरेश गावंडे व अशोक गोयल यांना पराभूत केले होते.त्यानंतर २०१२ , २०१७ व २०२६ मध्ये मनपावर निवडून गेले. यावेळी त्यांनी प्रभाग २३ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांचा पराभव केला. मनपात ते २०१७ मध्ये उपनेता होते. ऑक्ट्राय समिती, परिवहन समिती व स्थायी समितीचे सभापतीपदही त्यांनी भूषविले. पक्षाच्या संघटनेतही त्यांनी दोनदा महामंत्री म्हणून काम केले. गेल्या दशकांपासून नागपूरच्या राजकारणात सक्रिय असलेले बाल्या बोरकर यांच्या निवडीने पक्षाने एका निष्ठावान आणि अनुभवी नेत्याच्या खांद्यावर सभागृहाची जबाबदारी सोपविली आहे. प्रशासकीय कामाची उत्तम जाण आणि सर्वसामान्यांशी असलेला दांडगा संपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. पुर्व नागपुरात पक्षाचा नगरसेवकांमधील सर्वात परीचयाचा व लोकप्रिय चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. रजवाडा पॅलेस येथे या निवडीसाठी नगरसेवकांची ( Nagpur Power Shift ) बैठक पार पडली. यावेळी शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
 
जनतेची कामे निष्ठेने करा-गडकरी
 
या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nagpur Power Shift ) ऑनलाईन उपस्थित होते. शहराध्यक्ष तिवारी यांच्या मोबाईलवरून त्यांनी उपस्थित नगरसेवकांना मार्गदर्शन केले. जनतेची कामे निष्ठेने करा, असा सल्ला देत जुन्या नगरसेवकांनाही सोबत घ्या. मोठी कामे असल्यास आमदारांचे पत्र घ्या, त्यांना पाठपुरावा करा. नागपूर शहर देशात नंबर एकचे शहर करावयाचे असल्याने नगरसेवकांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचेही गडकरी म्हणाले.
 
सोमवारी सकाळी गटनोंदणी
 
भाजपच्या ( Nagpur Power Shift ) गटनेता निवडीनंतर आता सोमवार, २ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता विभागीय आयुक्तालयात गटनोंदणी केली जाणार आहे. तर, दुपारी २ वाजता महापौर व उपमहापौर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल, अशी माहिती नवनियुक्त गटनेते बाल्या बोरकर यांनी दिली.
 
गटनेता, सत्तापक्षाची भूमिका महत्वाची
 
मनपात भाजपच्या अनेक मोठया नेत्यांनी सत्तापक्ष नेते म्हणून जबाबदारी पार पडली. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे. दिवंगत प्रभाकर दटकेही गटनेते होते. आमदार प्रवीण दटके, आमदार संदीप जोशी, शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, अविनाश ठाकरे आदींनीही ही जबाबदारी पार पाडली. सभागृहात सत्तापक्ष नेता यांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. सभागृहाचे कामकाज व महापौरांकडून देण्यात येणाऱ्या निदेंशाला दिशा देण्यासाठी सत्तापक्ष नेत्याचे सभागृहातील निवेदन अत्यंत महत्वाचे मानले जाते.
 
सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करू. नेत्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. शहरातील नागरीकांचे जिव्हाळयाचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला ( Nagpur Power Shift ) कामाल लावू. राज्य सरकारकडून अधिकाधिक मदत आणून शहराच्या विकासाला हातभार लावण्याचा प्रयत्न केला जाईल.
-नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर, नवनियुक्त गटनेते, भाजप