5 Crore Scam : देवा रे देवा ! वीज चोरीचा धक्कादायक पर्दाफाश, तब्बल ५ कोटींचा चुना

01 Feb 2026 08:00:53
 
5 crore
 
नागपूर : ( 5 Crore Scam ) वीज चोरीविरुद्ध महावितरणने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यात सुमारे ५ कोटींची वीज चोरी उघडकीस आली आहे. नऊ महिन्यांत २,१३० वीज चोर पकडले. त्यापैकी ९०० हून अधिक जण थेट वीज तारांमध्ये हुक घालून वीज चोरी करीत होते. त्यांना १ कोटीपेक्षा जास्त दंड ठोठावला आणि त्यापैकी काहींवर पोलिस गुन्हे दाखल केले. १,९६३ ग्राहक थेट वीज चोरी करताना पकडले गेले तर १६७ जण विजेचा गैरवापर ( 5 Crore Scam ) करताना आढळले.
 
महावितरणचे ( 5 Crore Scam ) उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटणकर यांनी सांगितले, एप्रिल ते डिसेंबर २०२५ दरम्यान जिल्ह्यात ११,९६२ ग्राहकांच्या वीज जोडण्या तपासल्या. यापैकी १,९६३ ग्राहकांनी सुमारे ४,९९,५८,००० रुपयांची २३,८२,६३१ युनिट वीज चोरी केल्याचे आढळले. महावितरणने नियमांनुसार बिले आणि सेटलमेंट रकमेसह १.०३ कोटीचा दंड ठोठावला. वीज चोरांविरुद्ध एकूण ६.०२ कोटी रुपये थकबाकी असल्याचे निश्चित केले आहे.
 
३६ वीज चोरांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांमध्ये वीज कायद्यांतर्गत फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. मोहिमेदरम्यान वीज चोरीच्या अत्यंत अत्याधुनिक आणि धक्कादायक पद्धती उघड झाल्या. कारवाई केलेल्या ग्राहकांपैकी ९७४ जणांनी थेट मुख्य वीज लाईनला जोडून वीज चोरी केली होती. उर्वरित ९८९ ग्राहकांनी तांत्रिक खोडतोडीचा अवलंब केला होता. याशिवाय ज्या १६७ ग्राहकांनी त्यांच्या हेतूपेक्षा वेगळ्या कारणासाठी वीज वापरली त्यांच्याविरुद्ध कारवाई केली आणि एकूण ३९.३० लाखांचे बिल वसूल ( 5 Crore Scam ) केले.
 
मोहीम सुरूच राहणार
 
महावितरणने ( 5 Crore Scam ) स्पष्ट केले की, वीज चोरीमुळे नियमित आणि प्रामाणिकपणे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना सर्वाधिक नुकसान होते. अनधिकृत वीज ट्रान्सफॉर्मरवर जास्त भार टाकते. ज्यामुळे ट्रान्सफॉर्मर जळणे, शॉर्ट सर्किट होणे आणि वारंवार वीज खंडित होणे यासारख्या समस्या उद्भवतात. यामुळे महावितरणचे आर्थिक नुकसान होते. तसेच ग्राहकांचा असंतोषही निर्माण होतो. वीज चोरीविरुद्धची ही विशेष मोहीम महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र, संचालक सचिन तलेवार, प्रादेशिक संचालक परेश भागवत आणि मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. येत्या काळात बिघाड असलेले मीटर, सरासरी बिल असलेले कनेक्शन आणि 'अभय योजनेचा' लाभ न घेतलेल्या थकबाकीदारांची चौकशी केली जाईल.
Powered By Sangraha 9.0