नागपूर : ( Nagpur Municipal ) महापौरांच्या आगमनापूर्वीच नव्या सत्तापक्षापुढे आव्हानांचे डोंगर असेल. यातील एक म्हणजे मनपाच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचारी मागण्यांसाठी ९ फेब्रुवारीपासून अनिश्चित काळासाठी कामबंद आंदोलन सुरू करणार आहे.
महानगरपालिका ( Nagpur Municipal ) अस्थायी आरोग्य कामगार संघटनेचे अध्यक्ष जम्मू आनंद म्हणाले, वेतनात सतत होणाऱ्या विलंबामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होत आहे. घरभाडे, बँक हप्ते आणि मुलांचे शिक्षण खर्च भागवणे त्यांच्यासाठी अशक्य झाले आहे. वाढती महागाई आणि पेट्रोलच्या किमतींमुळे ही समस्या आणखी वाढली आहे. प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या प्रतिष्ठेची काहीच काळजी नाही. वेतनात विलंब झाल्यामुळे त्यांचे सामाजिक स्थान धोक्यात येत आहे, असा आरोप संघटनेने केला आहे.
संघटनेचे अध्यक्ष जम्मू आनंद आणि सचिव अर्चना मंगरुळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन सादर ( Nagpur Municipal ) केले. निवेदनात म्हटले आहे की, जुलै २०२५ पासून प्रलंबित १५ टक्के पगारवाढ अद्याप लागू झाली नाही. आरआय सेशन्स, यूएचएनडी, मोबिलिटी आणि आरोग्य वर्धिनी (दरमहा २,००० रुपये) सारखे प्रोत्साहन भत्ते २०२४ पासून प्रलंबित आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांवर नियुक्त लेखापालांवर प्रत्येकी दोन केंद्रांचा भार आहे. परंतु, ६-७ वर्षांपासून त्यांना अतिरिक्त कामाची भरपाई दिलेली नाही.
प्रशासनाला दिली पूर्व सूचना
युनियनने स्पष्ट केले की, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार नियमित वेतन मिळत असले तरी खालच्या पातळीवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या योग्य मानधनाची वारंवार विनंती ( Nagpur Municipal ) करावी लागते. शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकम यांच्यामार्फत आरोग्य सेवा आयुक्त आणि मोहीम संचालक, मुंबई यांना पत्र पाठविले आहे. शिष्टमंडळात कुंदा बुरडे, नीता वनवे, रंजना नागमोते, ममता नंदनवार आणि मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.