सावनेर : ( Divya Suryadarshan ) पुराणांमध्ये भगवान शंकराचे 21 अवतार व विश्वात साडे बारा जोतिर्लिंगाचे स्थान ज्ञात आहे. परंतु, अर्धनारीश्वर ज्योतिर्लिंगाबाबत अद्यापही लोकांना माहिती नाही. छिंदवाड रोडवरील मोहगाव हवेली येथे हजारो वर्ष पुरातन भगवान शिवाचे एक मंदिर असून त्यात ज्योतिर्लिंग अर्धनारीश्वरांची स्वयंभू मूर्ती आहे.
श्रावण महिना, महाशिवरात्री व वर्षभर या प्राचीन मंदिरात ( Divya Suryadarshan ) भाविकांची गर्दी पाहावयास मिळते. मध्य प्रदेशातील सौंसर तहसील अंतर्गत 6 कि.मी. दूर मोहगाव हवेली येथे सर्पा नदीच्या किनाऱ्यावर स्थित प्राचीन शिव मंदिरात अर्धे काळे व अर्धे कथ्थ्या रंगाचे शिवलिंग आहे. कार्तिक पौर्णिमा व महाशिवरात्री महोत्सवात सूर्यांची किरणे थेट शिवलिंगावर पडतात. काळा रंग भगवान शंकराचा व गव्हाळ व हलका गुलाबी रंग देवीमाता पार्वतीचा असल्याची मान्यता आहे. म्हणूनच हे ज्योतिर्लिंग ( Divya Suryadarshan ) पृथ्वीच्या मध्यभागात स्थापन करून सृष्टीवर मानव जाती निर्माण झाली. या मंदिरात कुमारीका इच्छित वर प्राप्तीसाठी नवस व १६ सोमवारचे व्रत धरून शिव व शक्तीची आराधना करतात. अर्धनारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरासमोरच सर्पनी नदी वाहते. या सर्पा नदीज महादेव मंदिरापासून दक्षिण-पूर्व दिशेमध्ये एक कुंड होते, ज्याचा आकार शिवलिंगप्रमाणे होता. चर्मरोगाने पीडित लोकांनी कुंडात स्नान केल्यास त्यांची व्याधी दूर व्हायची. सद्या हे कुंड जीर्ण झाले आहे. सर्पा नदीच्या उगमापासून संगमापर्यंत त्याचा आकार ओम सारखा प्रतित होतो.
दलपत शहाची ( Divya Suryadarshan ) अंतीम इच्छा होती की, त्यांच्या मृत्यनंतर समाधी येथे व्हावी. येथून शिव मंदिराचे सदैव दर्शन होईल, या उद्देशाने शिवमंदिराजवळ उत्तर-पश्चिम दिशेमध्ये काही अंतरावर समाधी हेतू मंदिर भवन बनविण्यात आले आहे. कालांतराने दलपत शहाने काही कारणांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याने त्यांची समाधी होऊ शकली नाही. मंदिरात मूर्ती नसल्यामुळे नकटा मंदिर असे म्हटल्या जाते. पौराणिक आधारे हे क्षेत्र दंडकारण्य म्हटल्या जाते. जी दैत्यगुरू शुक्राचार्यांची कर्मभूमी ( Divya Suryadarshan ) आहे. ते भगवान महादेवाचे अन्यन्य भक्त होते. त्यांनी सर्पा नदीच्या तीरावर तपस्या केली. हे स्थान नदीच्या बाजूला मंदिर परिसरात आहे.
शुक्राचार्यांच्या तपस्येने ( Divya Suryadarshan ) भोलेनाथ प्रसन्न झाले. शुक्राचार्यांनी भगवान शंकराला पार्वती मातेला त्यांच्या सोबत पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. देवांनी त्यांना अर्धनारीश्वरच्या रूपात दर्शन दिले. तेव्हापासून हे अर्धनारेश्वर भगवान ज्योतिर्लिंग रूपात स्थापित झाले. प्राचीन काळात या मंदिराची निर्मिती वास्तुशास्त्रानुसार करण्यात आली. हे मंदिर महामृत्यूंजय यंत्रावर आधारित असल्याकारणाने त्यास ‘शक्तीपीठ’ नावाने संबोधल्या जाते.
प्रथम विक्रमादित्याने सुरू केली पूजा
मोहगाव हवेली स्थित प्राचीन ज्योतिर्लिंगाबाबत असेही म्हटल्या जाते की, या भव्य ज्योतिर्लिंगाची पूजा-अर्चा करण्यासाठी प्रथम हिंदूसम्राट विक्रमादित्य दरवर्षी येत होते. १,३०० मध्ये या ज्योतिर्लिंगावर हेमाडपंथ नावाच्या राजाने भव्य शिव मंदिर ( Divya Suryadarshan ) निर्माण केले. त्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार रघुजी राजांनी केला येथील पूजाअर्चा, संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी देवगडच्या राजांनी निभवली. दलपत शहा यांनी माता चंडिका व भगवान शंकराचे परमभक्त होते. त्यांनी पांढुरना किल्ल्यांवर माता चंडिकेचे मंदिर बनविले व मोहगाव हवेली बनविली. तसेच प्राचीन शिव मंदिराची देखील डागडुजी केली.