Academic Fraud : २२ फसवणुकींचा स्फोट ! केंद्रप्रमुख निलंबित, २९ परीक्षा केंद्रे ठरली संवेदनशील

Top Trending News    20-Feb-2026
Total Views |

academic
 
नागपूर : ( Academic Fraud ) राज्य मंडळाच्या बारावी परीक्षेत फसवणुकीची २२ प्रकरणे उघडकीस आल्यानंतर संबंधित परीक्षा केंद्रप्रमुखांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यासोबतच संबंधित शिक्षकांची वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिफारस संस्थांकडे पाठविण्यात येणार असल्याने शिक्षक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे पाळत आणि पोलिस बंदोबस्त अशा उपाययोजना करूनही काही ठिकाणी विद्यार्थी गैरप्रकार करतात. या प्रकरणांची संपूर्ण जबाबदारी केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांवर टाकणे योग्य आहे का, असा प्रश्न संघटनांनी ( Academic Fraud ) उपस्थित केला आहे. संपूर्ण परीक्षा यंत्रणा कार्यरत असताना केवळ शिक्षकांवर कारवाई करणे अन्यायकारक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
 
शुक्रवारी दहावीची परीक्षा सुरू झाली. परंपरेनुसार दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार अधिक आढळतात. आतापर्यंत बारावीच्या परीक्षेत २२ गुन्हे नोंदवले गेले असून, ज्या केंद्रांवर विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळले, त्या केंद्रांच्या प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच संबंधित शिक्षकांची वार्षिक वेतनवाढ रोखण्याचा प्रस्ताव संस्थांकडे पाठविण्यात येणार असून, शिक्षक संघटनांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. वेतनवाढ रोखल्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठवावा लागतो आणि या प्रक्रियेत आर्थिक देवाणघेवाणीची शक्यता निर्माण होते, असा आरोपही काही संघटनांनी केला आहे. परीक्षेच्या नावाखाली होणारी ही कारवाई अन्यायकारक असल्याची भावना शिक्षकांमध्ये ( Academic Fraud ) आहे.
 
सखोल चौकशीची मागणी
 
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे (विजुक्ता) सरचिटणीस डॉ. अशोक गवाणकर यांनी सांगितले की, फसवणुकीच्या प्रकरणात कोणत्याही शिक्षकावर कारवाई करण्यापूर्वी सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. केवळ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई करणे योग्य नाही. बहुतांश शिक्षक प्रामाणिकपणे फसवणूकमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशा कारवाईमुळे शिक्षकांचे मनोबल खच्ची होते. परीक्षा देणारे ( Academic Fraud ) विद्यार्थी बहुतांशी इतर शाळांमधील असल्याने संबंधित शिक्षकांना थेट दोषी धरणे अयोग्य आहे, असे त्यांनी नमूद केले.
 
देखरेखीच्या यंत्रणेचा अभाव
 
दहावीच्या ( Academic Fraud ) परीक्षेसाठी नागपूर जिल्ह्यात २९ परीक्षा केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत; मात्र संपूर्ण जिल्ह्यात केवळ सहा भरारी पथके कार्यरत आहेत. मर्यादित मनुष्यबळामुळे सर्व केंद्रांवर प्रभावी तपासणी करणे अशक्य असल्याची बाब समोर आली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील संवेदनशील केंद्रांची तपासणी क्वचितच होत असल्याची तक्रार आहे. परीक्षा व्यवस्थेसाठी पुरेसा निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून अधिक भरारी पथके तैनात करावीत, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. विविध उपाययोजना जाहीर केल्या असल्या तरी प्रभावी देखरेखीच्या सुविधांचा अभाव असल्यामुळे फसवणूक रोखणे कठीण होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.