Maoist Crackdown : दहा कोटींची शिकार ! माओवादी जाळ्यात, सुरक्षा यंत्रणांचा मोठा डाव

Top Trending News    22-Feb-2026
Total Views |

maoi 
नागपूर : ( Maoist Crackdown ) माओवादी चळवळीचा आधार म्हणून कायम ज्याचं नाव घेतला गेलं त्या देवजी उर्फ तीपिरी तिरुपती याच्यावर सरकारनात दहा कोटींचं बक्षीस जाहीर केलं होतं. परंतु, धक्कादायक बाब म्हणजे त्याने स्वतःच्या 16 सहकाऱ्यांसह आज तेलंगणा पोलिसांसमोर आत्मा समर्पण केलं. त्याच्या या निर्णयामुळे माओवादी संघटनेला मोठी खीळ बसणार आहे. आगामी काळात संघटना नेतृत्वहीन होण्याच्या मार्गावर ( Maoist Crackdown ) असल्याचे देखील बोलल्या जाते आहे.
 
अगदी कालच नक्षलवादी चळवळीचा आधार मल्लोजुना वेणुगोपाल उर्फ भूपती याने काही पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने शस्त्रांच्या आधारे विकास शक्य नसल्याचे सांगत समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यानेच विकास होणार असल्याचे कबुल केले. भूपती यांच्या कबुलीनंतर थेट तिरुपती सारखा माओवादी तेलंगणा सरकारला शरण आला आहे. त्यामुळे ही घटना महत्त्वाची मानल्या जात आहे.