नागपूर : ( Media PowerShift ) नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, विदर्भ या संघटनेची विदर्भ प्रांत कार्यकारिणी नुकतीच गठीत झाली असून विदर्भातील ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक अविनाश पाठक हे अध्यक्ष तर ज्येष्ठ पत्रकार पराग जोशी हे सचिव म्हणून निवडले गेले आहेत.
राष्ट्रीय विचारांशी बांधलकी असणाऱ्या विदर्भातील पत्रकारांनी एकत्र यावे आणि संघटनात्मक बांधणी करून काही विधायक कार्य करावे तसेच सर्वच क्षेत्रातील पत्रकारांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ( Media PowerShift ) काही प्रयत्न करावे यासाठी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स ही संघटना सक्रिय झाली असून विदर्भातील ११ ही जिल्ह्यातील मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, वेब माध्यमे, डिजिटल माध्यमे यातील आणि मुक्त पत्रकार असे सर्वच क्षेत्रातील पत्रकार या संघटनेशी जुळलेले आहेत.
अध्यक्ष म्हणून निवडले गेलेले अविनाश पाठक हे मुक्त पत्रकार असून गत पन्नास वर्षांपासून पत्रकारितेशी जुळलेले ( Media PowerShift ) आहेत. दूरदर्शनचे वृत्त छायाचित्रकार म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली असून मुद्रित माध्यमांमध्ये महाराष्ट्रातील विविध प्रतिष्ठित वृत्तपत्रांसाठी त्यांनी पत्रकारिता केली आहे. हिंदुस्तान समाचार या बहुभाषिक राष्ट्रीय वृत्तसंस्थेचे विदर्भ ब्युरो चिफ म्हणूनही त्यांनी आठ वर्ष काम केले आहे. विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले असून त्यांची आतापर्यंत १५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पत्रकारिता आणि लेखन क्षेत्रातील विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी ( Media PowerShift ) त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
सचिव म्हणून निवडले गेलेले पराग जोशी हे देखील दीर्घ काळापासून पत्रकारितेत सक्रिय असून सध्या मुक्त पत्रकारिता करीत ( Media PowerShift ) आहेत. त्यांनी दैनिक महाविदर्भ पासून आपली पत्रकारिता सुरू केली. काही काळ दैनिक जनवादमध्ये पत्रकारिता केल्यावर दैनिक तरुण भारत मध्ये विविध जबाबदारीच्या पदांवर त्यांनी काम केले आहे आणि मुख्य वार्ताहर या पदावरून ते निवृत्त झाले आहेत.विविध सामाजिक कामांमध्येही ते सक्रिय आहेत.
कार्यकारिणीतील इतर सदस्य खालील प्रमाणे आहेत.
उपाध्यक्ष.. १)चारुदत्त कहु, मुक्त पत्रकार, नागपूर
२)विकास वैद्य.. दैनिक हितवाद, नागपूर
सहसचिव... १)नितीन कुलकर्णी, संपादक साप्ताहिक दलप्रभा, वाशिम
२)अमर काणे, प्रतिनिधी, झी २४ तास, नागपूर
कोषाध्यक्ष...
राघवेंद्र टोकेकर, नवराष्ट्र नागपूर
कार्यकारिणी सदस्य
१)रेवती जोशी, डिजिटल तरुण भारत नागपूर.
२)स्नेहल जोशी, प्रतिनिधी, सुदर्शन वाहिनी, नागपूर
३)सुनील कुहिकर, संपादक, शंखनाद नागपूर.
४)संजय तिवारी प्रतिनिधी, एन डी टी व्ही नागपूर.
५)मीरा टोळे, मुक्त पत्रकार, नागपूर..
जिल्हानिहाय कार्यकारिणी सदस्य
१)नागपूर.. मनीष कुलकर्णी, हिंदुस्थान समाचार..
२)भंडारा.. अजिंक्य भांडारकर, तरुण भारत लाखनी
३)गोंदिया.. जयंत शुक्ला,दै. लोकशाही वार्ता
४)चंद्रपूर.. प्रशांत विघ्नेश्वर, नवराष्ट्र
५)गडचिरोली.. नंदकिशोर काथवटे तरुण भारत.
६)वर्धा.. प्रफुल्ल व्यास तरुण भारत
७)यवतमाळ.. अनिरुद्ध पांडे, तरुण भारत
८)वाशिम.. चंद्रकांत लोहाणा, तरुण भारत
९)अमरावती.. निशिकांत राजबिंडे दै.हिंदुस्थान
१०)अकोला.. महेंद्र कवीश्वर, मुक्त पत्रकार
११)बुलढाणा.. विजय कुलकर्णी, तरुण भारत
संघटनेतर्फे लवकरच विदर्भातील पत्रकारांसाठी विविध विधायक उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.