Power Struggle : स्थायी समिती निवडताना भाजप अडचणीत, कॉंग्रेस-सेना ठाकरेंकडून.....

Top Trending News    04-Feb-2026
Total Views |

Power Struggle 
नागपूर : ( Power Struggle ) महापालिकेत महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली. शुक्रवारी मनपाला नवे कारभारी मिळतील. त्यानंतर लगेच याच निवडीनंतर स्थायी समितीचे गठनही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपाचा खजीनदारासोबत सदस्य म्हणून काही 'रक्षक; सदस्यही निवडले जाणार आहे. भाजपात स्थायीवर नवे तरूण नेतृत्व म्हणून शिवानी दाणी यांचे नाव ठरल्यात जमा असल्याने, इतर ११ सदस्यांच्या नावांवर मंथन सुरू आहे. तर, तिकडे कॉंग्रेसनेही ठाकरे सेना सोबत आल्याने नागपूर महाविकास आघाडीतून द्यावयाच्या ४ नावांचा निर्णय गुरूवारी करणार असल्याचे ठरविले ( Power Struggle ) आहे.
 
स्थायी समितीवर १६ सदस्य असतात. पक्षीय बलाबलानुसार ( Power Struggle ) सत्तापक्ष भाजपला ११ सदस्य मिळतील. ४ सदस्य कॉंग्रेसच्या वाटयाला येतील. तर, एक सदस्य एमआयएमच्या कोटयात असेल. सर्वात मोठे आव्हान भाजपसमोर असेल. स्थायी समिती नियुक्त करताना व त्यावर सदस्य नेमताना विधानसभानिहाय समतोल साधावा लागेल. शिवाय, भाजपमध्ये आतापासूनच काही ज्येष्ठ नगरसेवक पहिल्या समितीत नेमणूक नको, या विचाराचे आहेत. त्यामुळे नेतृत्वाचीही मोठी गोची होत आहे. परंतु, स्थायी नव्याच्या नेतृत्वात असली तरीही एक दोन ज्येष्ठांना यात घ्यावे लागणार आहे. शहरातील विकासकामांना मंजुरी देताना निधी देण्याचे कामही स्थायी समिती करते. या समितीचे मनपाच्या प्रशासनात महत्व असल्याने समितीवर जाण्यास तसेही अनेकजण उत्सुक असतात. परंतु, भाजपमध्ये यावेळी दिसत असलेला अनुत्साह सध्या चचेंचा विषय बनला आहे. भाजपनेही ( Power Struggle ) काही ज्येष्ठ सदस्यांचे नाव यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात संधी दिली गेली नाही वा पुढे ज्यांना मोठया संधीची शक्यता कमी आहे, अशांना समितीवर सदस्य म्हणून प्राधान्य देण्याचा विचार पक्ष करीत आहे. दरम्यान, भाजपची महापौर-उपमहापौर निवडीपूवीं गुरूवार, ५ फेब्रुवारीला दुपारी नगरसेवकांसोबत बैठक आहे. त्याच बैठकीत स्थायी समिती सदस्यांची नावे ठरविली जाणार असल्याची माहिती आहे.
 
काँग्रेस गुरुवारी ठरविणार नावे
 
महापौर-उपमहापौर ( Power Struggle ) निवडीवेळीच १६ सदस्यीय स्थायी समिती गठीत होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे कॉंग्रेसनेही यासाठी तयारी केली आहे. आता कॉंग्रेससोबत संयुक्त आघाडीत ठाकरे सेना आल्याने त्यांच्या दोन सदस्यांपैकी एकाला या समितीवर द्यावे लागेल. त्यामुळे ते पहिल्या पाच वर्षात कधी घ्यायचे, याचाही निर्णय होणार आहे. गुरूवार, ५ फेब्रुवारीला कॉंग्रेस नगरसेवकांची महापौर-उपमहापौर निवडणूकपुर्व बैठक आहे. यात या नावाचा विचार केला जाईल, असे संकेत कॉंग्रेसचे गटनेते संजय महाकाळकर यांनी दिले.

मुस्लीम लीगची खेळी 
 
संख्याबळानुसार ( Power Struggle ) एमआयएमचे ६ नगरसेवक निवडून आले. त्यांचा किमान एक सदस्य स्थायी समितीवर जाईल. परंतु, ४ नगरसेवक असलेल्या मुस्लीम लीगला एकही सदस्यपद मिळण्याची शक्यता कमी आहे. २०१२ प्रमाणे मुस्लीम लीग भाजपसोबत आघाडीत सहभागी झाली होती. तसाच, प्रयोग स्वतंत्र गटनोंदणीनंतर पाच वर्षासाठी भाजपच्या आघाडीत जाऊन करण्याची शक्यता आहे. असे केल्यास मुस्लीम लीगलाही भाजपकडून पाच वर्षात काही संधी दिली जाऊ शकते. भाजपसोबतच्या आघाडीत सहभागी होण्यामागे प्रभागाचा विकास व कामांसाठी निधी, असे धोरण असल्याचे मुस्लीम लीगचे म्हणणे आहे.