Smoke Silent Killer : अलर्ट ! धूर बनला ‘सायलेंट किलर’, निरपराध लोकही टार्गेटवर

Top Trending News    07-Feb-2026
Total Views |

smoke killer
 
नागपूर : ( Smoke Silent Killer ) फुफ्फुसाचा कर्करोग हा केवळ धूम्रपानाशी संबंधित आजार राहिलेला नसून वाढत्या वायूप्रदूषणामुळे धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींमध्येही याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. वाहनांचे प्रमाण यामुळे हवेत मिसळणाऱ्या घातक रसायनांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दिल्ली, मुंबई नंतर आता नागपूर देखील प्रदुषणाच्या क्रमवारीत आले आहे. शहरातील हवा दिवसेंदिवस प्रदुषित ( Smoke Silent Killer ) होत असल्याचे दिसून येत आहे.
 
ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरीच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी सुमारे १५ लाख नवीन कर्करोग रुग्ण आढळतात. त्यात फुफ्फुसाच्या कर्करोगाचा मोठा वाटा आहे. औद्योगिकदृष्ट्या प्रदूषणग्रस्त जिल्ह्यांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास येते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सरचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मुर्तझा बोहरा यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यातील कोळशाच्या खाणी, औष्णिक वीज प्रकल्प आणि इतर उद्योगांमधून होणारे उत्सर्जन यामुळे तेथील हवा अधिक प्रदूषित ( Smoke Silent Killer ) होत आहे. परिणामी, त्या भागात फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण तुलनेने अधिक आढळतात.
 
आंतरराष्ट्रीय कॅन्सर संशोधन संस्था (आयएआरसी) आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार, हवेत आढळणारे पॉलीसायक्लिक अ‍ॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स, फॉर्मल्डिहाइड आणि बेंझिनसारखे रासायनिक घटक फुफ्फुसाच्या पेशींवर दीर्घकालीन परिणाम करतात. या घटकांचा सातत्याने संपर्क आल्यास कर्करोगाचा धोका वाढतो. विशेषतः अॅडेनोकार्सिनोमा हा फुफ्फुसाच्या कर्करोगाचा प्रमुख उपप्रकार असून तो पुरुष आणि महिलांमध्ये समान प्रमाणात दिसून येतो. काही संशोधनांनुसार, धूम्रपान कधीही न केलेल्या रुग्णांमध्येही ( Smoke Silent Killer ) या प्रकाराचे प्रमाण लक्षणीय आहे.
 
शहरातील हवा देखील प्रदूषित
 
हवेतील सूक्ष्म कण (पीएम2.5 व पीएम10), वाहनांमधून निघणारे धूर, औद्योगिक उत्सर्जन आणि उघड्यावर होणाऱ्या जाळपोळीमुळे शहरातील वायूप्रदूषणात वाढ होत आहे. विशेषतः हिवाळ्यात हवेतील धुरकटपणा अधिक जाणवतो. काही भागांमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) मध्यम ते खराब श्रेणीत नोंदवला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे परिणाम दिसून येत आहेत.
 
लहान बालकांवरही कॅन्सरचा वाढता प्रभाव
 
तज्ज्ञांच्या मते, बालकांची श्वसनसंस्था आणि रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे प्रदूषित हवेत असलेले सूक्ष्म कण, रासायनिक घटक आणि धूर यांचा परिणाम त्यांच्या फुफ्फुसांवर अधिक वेगाने होऊ शकतो. दीर्घकाळ अशा वातावरणात राहिल्यास श्वसनाचे आजार, दमा, ऍलर्जी आणि गंभीर प्रकरणांमध्ये कर्करोगाचा ( Smoke Silent Killer ) धोका वाढू शकतो.
 
वाहनांचा धूर, कोळसा, औद्योगिक उत्सर्जन जिवघेणे
 
पॉलीसायक्लिक अ‍ॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स, फॉर्मल्डिहाइड आणि बेंझिन हे वायुप्रदूषणात आढळणारे सर्वाधिक घातक रासायनिक घटक आहेत. ते वाहनांचा धूर, जळत्या कोळशाचा धूर व औद्योगिक उत्सर्जनातून हवेत मिसळतात. दीर्घकाळ या घटकांच्या संपर्कात राहिल्यास फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. चंद्रपुरात असणाऱ्या कोळशाच्या खाणी, कागद कारखाना आणि औष्णिक वीज केंद्रांतून सतत निघणाऱ्या धुरातून याचे प्रणात वातावरणात ( Smoke Silent Killer ) या प्रमाणाचे घटक सर्वाधिक आहे.
 
वायु प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने काय करावे ?
 
१ औद्योगिक उत्सर्जनावर कडक निर्बंध : कारखाने व औद्योगिक प्रकल्पांकडून होणाऱ्या धूर आणि घातक वायूंच्या उत्सर्जनावर कठोर नियंत्रण ठेवावे.
 
२ हवेच्या गुणवत्तेचे सातत्याने निरीक्षण : शहर व ग्रामीण भागात हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी अधिक मॉनिटरिंग केंद्रे उभारून नियमित अहवाल सार्वजनिक करावेत.
 
३ स्वच्छ ऊर्जा व हरित तंत्रज्ञानाला प्रोत्साहन : कोळसा व इंधनावर आधारित ऊर्जेऐवजी सौर, पवन यांसारख्या स्वच्छ ऊर्जेला प्राधान्य देत हरित तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा.
 
४ वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करणे : इलेक्ट्रिक वाहन धोरणांना प्राधान्य देऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करावी. जुन्या व प्रदूषणकारी वाहनांवर नियंत्रण आणावे.