नागपूर : ( Mental Health Crisis ) उपराजधानीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात गेल्या दीड वर्षांपासून अत्यावश्यक मानसोपचार औषधांचा पुरवठा ठप्प असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुंबई येथील आरोग्य विभागाकडून औषधांचा नियमित पुरवठा न झाल्याने सध्या रुग्णालयातील ४३५ भरती रुग्णांचे उपचार अडचणीत आले असून त्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला ( Mental Health Crisis ) आहे.
विदर्भासह छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी लगतच्या राज्यांतील गरीब आणि गरजू मनोरुग्णांसाठी आशेचा किरण मानले जाणारे हे रुग्णालय सध्या स्वतःच संकटात सापडले आहे. दररोज सुमारे २५० बाह्यरुग्ण उपचारासाठी येथे येतात; मात्र औषधसाठा पूर्णपणे संपल्याने त्यांच्यावर उपचार करणे प्रशासनासाठी कठीण झाले आहे. रुग्णालयात ‘ओलान्झापाइन’, ‘रिस्पेरिडोन’, ‘अॅमिट्रिप्टिलीन’, ‘सोडियम व्हॅल्प्रोएट’, ‘पॅसिटेन’, ‘टिनिडाझोल’ यांसारख्या अत्यावश्यक औषधांचा पूर्ण तुटवडा आहे. मानसोपचारात औषधांमध्ये खंड पडणे म्हणजे रुग्णाच्या आजारात वाढ होण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे रुग्णांची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिक बिघडण्याची शक्यता वाढली आहे. नियमांनुसार बाहेरून औषधे लिहून देणे शक्य नसल्याने डॉक्टरही ( Mental Health Crisis ) हतबल झाले आहेत.
कशासाठी होतो या औषधांचा उपयोगओलान्झापाइन : स्किझोफ्रेनिया व तीव्र नैराश्याच्या उपचारासाठी अत्यावश्यक.
रिस्पेरिडोन : आक्रमक व असंतुलित वर्तन नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचे.
अॅमिट्रिप्टिलीन : तीव्र नैराश्याच्या अवस्थेत उपयुक्त.
सोडियम व्हॅल्प्रोएट : फिट्स नियंत्रण व मेंदू शांत ठेवण्यासाठी गरजेचे.
पॅसिटेन : इतर औषधांच्या साईड इफेक्ट्स रोखण्यासाठी आवश्यक.
टिनिडाझोल : संसर्ग नियंत्रणासाठी वापरले जाणारे औषध.
‘विथड्रॉवल’चा धोका
मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, ओलान्झापाइनसारखी ( Mental Health Crisis ) औषधे अचानक बंद केल्यास ‘विथड्रॉवल सिम्पटम्स’ दिसू शकतात. यामुळे रुग्णाचे मानसिक संतुलन ढासळणे, आक्रमक वर्तन वाढणे किंवा आत्महानीचे विचार तीव्र होण्याचा धोका असतो. त्यामुळे औषधपुरवठ्यातील खंड ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते. रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रशासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला आहे.
दीड वर्षांपासून उधारीवर औषधेसूत्रांच्या माहितीनुसार, आरोग्य विभागाकडून ( Mental Health Crisis ) नियमित पुरवठा न झाल्याने रुग्णालय प्रशासनाने विदर्भातील इतर शासकीय रुग्णालयांकडून उधारीवर औषधे घेऊन तात्पुरती व्यवस्था केली. मात्र ही उपाययोजना अल्पकालीन ठरली असून सध्या साठा संपुष्टात आला आहे. यासंदर्भात आरोग्य सेवा विभागाच्या सहसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
जिल्हा शल्यचिकित्सक ( Mental Health Crisis ) कार्यालयामार्फत स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच वरिष्ठ स्तरावरही तुटवड्याची माहिती देण्यात आली असून लवकरच औषधांचा पुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे.
- डॉ. सतीश हुमणे, वैद्यकीय अधीक्षक
प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर