नागपूर : ( Ulhas Narad Bail Rejected ) नागपूर विभाग शिक्षण उपसंचालक उल्हास नरड याने बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक भरती केल्याच्या आरोपात अटकेत असलेल्या चार जणांनी जामिनासाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिका-यांसमक्ष अर्ज केला आहे. याप्रकरणी न्यायाधीश एस. एच. उके यांनी राज्य सरकारला नोटीस जारी करून उत्तर सादर करण्याचे आदेश ( Ulhas Narad Bail Rejected ) दिले होते. त्यानुसार मंगळवारी तपास अधिका-यांनी 'से' अहवाल सादर केला. त्यानंतर न्यायालयाने पाचही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
उल्हास नरड यांच्यासह अटकेतील आरोपींमध्ये पराग पुडके, निलेश मेश्राम, संजय दुधाळकर, सुरज नाईक यांचा समावेश आहे. दिनांक 16 एप्रिलपासून हे पाचही जण मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. उल्हास नरड यांच्या वतीने बाजू मांडणारे अॅड. अनिल ढवस यांनी पोलिसांनी शहानिशा न करता गुन्हा नोंदविल्याचे यावेळी न्यायालयाला सांगितले. गुन्ह्याची नोंद होण्यापूर्वीच पोलिस आरोपीकडे गेले होते.