नागपूर : ( Bogus Teacher Recruitment Scam ) बोगस शिक्षक भरती व शालार्थ आयडी घोटाळ्यातील बोगस कागदपत्राच्या आधारे पराग पुडके याची शिक्षकपदी नियुक्ती करून त्याला भंडारा जिल्ह्यातील एका शाळेत मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली होती. या प्रकरणाची तक्रार सदर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. तपासाअंती पोलिसांनी उपसंचालक उल्हास नरड याला गडचिरोलीतून अटक केली होती. त्यानंतर शिक्षक पुडके, अधीक्षक निलेश मेश्रामला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच प्रमाणे लिपीक सूरज इंगळे व उपनिरीक्षक संजय दुधाळकर यांनाही अटक करण्यात आली. या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात ( Bogus Teacher Recruitment Scam ) आली आली.
या घोटाळ्यातील आरोपी उपसंचालक उल्हास नरड व माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक नीलेश मेश्राम यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 15 दिवसानंतर त्यांच्या निलंबनाचे आदेश शासनाने काढले. त्याच प्रमाणे उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक संजय दुधाळकर यांच्याही निलंबनाचे आदेश काढण्यात आले.
सायबर पोलिसांकडूनही नरड व नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ढवळे व भोसले यांनाही अटक करण्यात आली आहे. उल्हास नरड, नीलेश मेश्राम व संजय दुधाळकर हे वर्ग एकचे अधिकारी असल्याने त्यांच्यावर निलंबन कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. नियमानुसार 48 तास शासकीय अधिकारी, कर्मचारी पोलिस कोठडीत असल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई होते. परंतु या सर्वांवर जवळपास 15 दिवसांनी निलंबनाची कारवाई करण्यात आली.